मुंबई: जेट एअरवेज कर्मचार्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन
यामध्ये सरकारने मध्यस्थी करून जेट कर्मचार्यांची नोकरी वाचवली जावी अशी मागणी आज जेट एअरवेजने केली आहे
जेट एअरवेजचे (Jet Airways) कर्मचारी आज आझाद मैदानात (Azad Maidan) एकत्र जमले आहे. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज अनिश्चित काळासाठी बंद पडले आहे. त्यामुळे आता अनेक जेट एअरवेज कर्मचार्यांची नोकरी धोक्यात आली आहे. यामध्ये सरकारने मध्यस्थी करून जेट कर्मचार्यांची नोकरी वाचवली जावी अशी मागणी आज जेट एअरवेजने केली आहे.नालासोपारा: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
ANI ट्विट
आझाद मैदानामध्ये आज जेट एअरवेजच्या कर्मचार्यांनी एकत्र येऊन ' जेट एअरवेज वाचवा' असे मेसेज असलेले फलक घेऊन निर्दशन करत आहेत. मागील दोन महिन्यांपासून जेट एअरवेजच्या कर्मचार्यांना पगार देण्यात आलेला नाही. 17 एप्रिलपासून जेट एअरवेज बंद झाली आहे.