Jaykumar Gore’s Son Bike Stunts: मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा बाईक स्टंट वादास कारण, Video Viral
Adityaraj Gore Bike Stunt: महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याचा नंबर प्लेटशिवाय धोकादायक बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी कायदा अंमलबजावणी आणि सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ही चर्चा मंत्री गोरे यांच्या कारनाम्यामुळे नव्हे तर त्यांच्या मुलाने केलेल्या कथीत स्टंटबाजीमुळे आहे. त्यांचा मुलगा आदित्यराज गोरे (Adityaraj Gore) याचा नंबर प्लेटशिवाय धोकादायक बाईक स्टंट ( Bike Stunt) करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सातारा-कोल्हापूर महामार्गावर ( Satara-Kolhapur Highway) हा स्टंट केल्याचे समजते. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि तरुणाईमध्ये बेपर्वा वाहन चालविणे याबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी या स्टंटबाजीवरुन जोरदार टीका केली आहे. कथित लैंगिक छळ प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे उठलेले वादळ आणि सदर प्रकरण हळूहळू निवळत असताना मंत्री गोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
व्हायरल व्हिडिओवरुन कायदेशीर आणि सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित
एक्स (पूर्वी ट्विटर) वापरकर्ता भैया पाटील यांनी शेअर केलेल्या व्हायरल क्लिपमध्ये आदित्यराज गोरे नंबर प्लेटशिवाय बाईकवर धोकादायक स्टंट करताना कथितरित्या दिसत आहेत. ज्यामुळे रस्ता सुरक्षा आणि वाहतूक कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. राजकीय विशेषाधिकार त्यांना कायदेशीर परिणामांना टाळण्याची परवानगी देत आहे का असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Couple Engaging in PDA: दुचाकीवरील जोडप्याचे प्रेमळ चाळे; व्हिडीओ व्हायरल)
भैया पाटील यांनी राज्य सरकार आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आणि सामान्य नागरिकांपेक्षा मंत्र्यांच्या मुलासाठी वेगळे कायदे आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की जर एखाद्या सामान्य माणसाने असे स्टंट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा दंड, तुरुंगवास किंवा वाहन जप्तीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Jaykumar Gore Nude Pictures News: जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप; मंत्र्यांकडून आरोपाचे खंडण, कायदेशीर कारवाईचा ईशारा)
मंत्र्याचा मुलगा बाईक स्टंट करताना
विरोधी पक्षनेत्यांकडून कारवाईची मागणी
राजकीय वर्तुळातून तीव्र टीका होऊ लागल्यानंतर, आदित्यराज गोरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ डिलीट केला, परंतु वाद वाढतच गेला. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी या वादात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, ज्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचाही कारभार आहे. 'मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत का? कारवाई का केली जात नाही?' असा प्रश्न राऊत यांनी विचारला आणि सरकार वाहतूक कायद्यांची समान अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. (हेही वाचा, Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई (Watch))
दरम्यान, आपल्या मुलावरुन निर्माण झालेल्या वादावर मंत्री जयकुमार गोरे यांनी अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय, महाराष्ट्र सरकार आदित्यराज गोरे यांच्यावर काय कारवाई करते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)