Jalna News : बायको गेली माहेरी, दारुडा नवरा विरहात व्याकूळ; मोबाईल टॉवरवर 'शोले स्टाईल' आंदोलन (Video)

बायकोच्या विरहाने व्याकूळ झालेला हा इसम दारुच्या नशेतच टल्ली झाला. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने चक्क मोबाईल टॉवर (Mobile Tower) गाठला.

Sholay-Style Protest | (Photo Credit - Twitter)

बायको (Wife) माहेरी गेल्याने आतीव दु:ख झाल्याने जालना येथील एका दारुड्या नवऱ्याने (Husband ) 'शोले स्टाईल' आंदोलन (Sholay-Style Protest) केले आहे. बायकोच्या विरहाने व्याकूळ झालेला हा इसम दारुच्या नशेतच टल्ली झाला. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने चक्क मोबाईल टॉवर (Mobile Tower) गाठला. मोबाईल टॉवरवर चढत त्याने शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. आंदोलनाचे हे नाट्य जवळपास 4 तास चालले. जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर (Badnapur) तालुक्यातील दाभाडी (Dabhadi) येथे हा प्रकार बुधवारी (20 जुलै) घडला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गणपत बकाल असे या तरुणाचे नाव आहे. टॉवरवर चढलेल्या गणपत बकाल याला खाली उतरण्यासाठी ग्रामस्थ अवाहन करत होते. परंतू, दारुच्या नशेत टल्ली झालेल्या गणपतच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचत नव्हता. गावकरी त्याला अवाहन करत होते तेव्हा सुरुवातीला तो माझी बायको माहेरी गेली आहे. तिला परत आणा. तरच मी खाली उतरेन असे तो बोलत होता. गावकरीही त्याची समजूत घालत होते. मात्र, पुढे त्याने भलतीच असंबद्ध बडबड सुरु केली. त्यामुळे गावकऱ्यांचाही नाईलाज झाला.

ट्विट

बायकोला माहेरहून परत आणा असे म्हणत सुरु झालेली गणपत बकाल याची बडबड पुढे मला घरकुल मंजूर व्हायला हवे. ग्रामपंचायतने हे काम करायला हवे, असे काहीसे बोलणे सुरु केले. शेवटी ग्रामस्थांचाही नाईलाज झाला. अखेर नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत गणपत याला खाली उतरण्याचे अवाहन केले. तरीही तो खाली उतरला नाही. पोलिसांचे अवाहन धुडकावून लावल्यानंतर मात्र अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तरीही तो न जुमानता टॉवरवरच चढून बसला. अखेर चार तासांनी तो खाली उतरला. पोलिसांनी सध्या त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.