Jalna Medical Negligence: गर्भवती महिलेच्या पोटाला फिनाईल लावलं, त्वचा भाजली; भोकरदन येथे वैद्यकीय निष्काळजीपणा
गर्भवती महिलेच्या आरोग्य तपासणीवेळी (Bhokardan Medical Negligence) लावण्यात येणाऱ्या जेली ऐवजी चक्क फिनाईल लावले गेले. ज्यामुळे चक्क या महिलेच्या पोटाची त्वचा भाजली गेली. सदर महिला खापरखेडा वाडी गावातील असून ती प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. दरम्यान सोनोग्राफी सेंटरमध्ये झालेल्या तपासणीवेळी डॉक्टरांकडून हा संतापजनक प्रकार घडला.
डॉक्टरांकडून होणारा वैद्यकीय निष्काळजीपणा () रुग्णाच्या आरोग्य आणि अनेकदा जीवावरसुद्धा बेतल्याची उदाहरणे आहेत. जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital in Bhokardan, Jalna) देखील असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गर्भवती महिलेच्या आरोग्य तपासणीवेळी (Bhokardan Medical Negligence) लावण्यात येणाऱ्या जेली ऐवजी चक्क फिनाईल लावले गेले. ज्यामुळे चक्क या महिलेच्या पोटाची त्वचा भाजली गेली. सदर महिला खापरखेडा वाडी गावातील असून ती प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. दरम्यान सोनोग्राफी सेंटरमध्ये झालेल्या तपासणीवेळी डॉक्टरांकडून हा संतापजनक प्रकार घडला.
जनमानसात संताप
गर्भवती महिलाच नव्हे तर कोणताही रुग्ण तपासणीसाठी आला असता डॉक्टरांनी अधिक गांभीर्याने आणि सर्व वैद्यकीय नियम आणि संकेतांची काळजी घेऊनच तपासणी करणे अपेक्षीत असते. अशा वेळी डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा दाखवणे अतिशय संतपाजनक असल्याची भावना जनमानसात उमटत आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, संपूर्ण प्रकरण समजून घेतले जाईल. डॉक्टर आणि तिथल्या परिचारिकेची चौकशी केली जाईल. (हेही वाचा, MP Shocker: मध्य प्रदेशच्या दमोह रुग्णालयात बनावट हृदयरोगतज्ज्ञाने केल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया; 7 जणांचा मृत्यू, FIR दाखल, आरोपी फरार)
डॉक्टरांकडून स्पष्टीकरण
जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सदर महिला तिसऱ्या खेपेस गरोदर होती. त्यांना प्रसुतीपूर्व लक्षणे दिसू लागल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांची प्रसुती सुरु झाली. प्रसुतीदरम्यान बाळाचे ठोके ऐकण्यासाठी गर्भवती महिलेच्या पोटास डोपलर लावलं जातं. या महिलेच्या पोटासही ते लावण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या परिचारिकेने डोपलरलावण्यापूर्वी जेली लावण्या ऐवजी चुकून फिनायल किंवा आयोडिनसदृश्य काहीतरी द्रव पदार्थ लावला. ज्यामुळे महिलेच्या पोटावरील त्वचेचा वरचा भाग भाजला (Superficial Burning) गेला. (हेही वाचा, Ulhasnagar Man Declared Dead Found Alive: खळबळजनक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती जीवंत; शिवनेरी हॉस्पिटलला UMC ची कारणे दाखवा नोटीस)
चौकशीचे आदेश
परिचारिकेकडून घडलेली चूक लक्षात येताच त्याची तातडीने दखल घेण्यात आली. महिलेच्या त्वचेवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. परिचारिकेकडून ही चुक नजरचुकीने घडली की, तिने हे मुद्दामहून केली गेली. याबाबत चौकशी करण्यात येईल. दरम्यान, महिलेची प्रसुती यशस्वी झाली असून, बाळ आणि बाळंतीन यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यांना कोणताही धोका नाही. महत्त्वाचे असे की, आम्ही रुग्णालयात अॅसीड वापरत नाही. त्यामुळे महिलेच्या पोटाला जे लावण्यात आले ते फिनाईल किंा आयोडीन वापरले गेले असावे अशी शक्यता आहे. आम्ही चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितल्याचेही, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पीडित महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील संबंधीत डॉक्टर आणि परिचारिकेवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परिचारिकेने मुद्दाहूनच रुग्णाच्या पोटावर अॅसिड लावल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2025 09:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

