International Scholarships: ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनादेखील मिळणार शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता; धनंजय मुंडे यांची माहिती

International Scholarships: 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे.

Dhananjay Munde (PC - Twitter)

यासंदर्भात समाज कल्याण आयुक्त पुणे यांना राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार, शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या या निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयानुसार, 2019-20 आणि त्याआधीच्या वर्षामध्ये परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड होऊन परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले व सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी सद्यस्थितीत परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असतील त्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या सत्रासाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता मंजूर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 275 जणांचा मृत्यू)

याशिवाय 2019-20 मध्ये निवड झालेले परंतु, सद्यस्थितीत भारतात राहून किंवा भारतात परत येऊन पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना 2020-21 च्या पहिल्या सहामाहिसाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जे विद्यार्थी भारतात परत येण्यास इच्छुक असतील त्यांना ते ज्या दिनांकास परत येतील तोपर्यंतचा निर्वाहभत्ता व येण्या-जाण्याचे नियमानुसार विमान प्रवास भाडे देखील देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now