INS Viraat: 30 वर्ष सेवेसाठी दिलेल्या आयएनएस विराट जहाजाचा अंतिम प्रवास; मुंबईहून गुजरात च्या दिशेने वाटचाल सुरु
गुजरात मधील अलंग स्थित असलेल्या जहाज तोडणाऱ्या यार्डकडे ते नेले जात आहे.
सर्वाधिक काळ सेवेत दाखल झालेल्या आयएनएस विराट (INS Viraat) या लढाऊ विमान वाहक जहाजाचा आज अंतिम प्रवास मुंबईहून गुजरताच्या दिशेने सुरु झाला आहे. गुजरात मधील अलंग स्थित असलेल्या जहाज तोडणाऱ्या यार्डकडे ते नेले जात आहे. नौसेत विराट जहाजाला 'Grand Old Leady' असे सुद्धा संबोधले जाते. अलंग स्थित श्रीराम ग्रुपने या ऐतिहासिक लढाऊ विमान वाहक जहाजाची 38.54 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या नावावर केले. हे एकमेव असे लढाऊ विमान वाहक जहाज आहे त्याने ब्रिटेन आणि भारत नौसेनेला सेवा दिली आहे.
विराट सेंटोर श्रेणीतील लढाऊ वाहून नेणारे जहाज आहे. 226 मीटर लांब आणि 49 मीटर रुंद अशा या युद्धाच्या जहाजाचे वजन 27,800 टन आहे. 1984 मध्ये भारताने हे खरेदी केले होते आणि 1987 मध्ये भारतीय नौसेनाने आयएनएस विराट नावाने ते आपल्यात सामील करुन घेतले. येथे आयएनएस विक्रांत सोबत त्याची पेअर करण्यात आली. 1997 मध्ये विक्रांत सेवानिवृत्त झाली त्यानंतर जवळजवळ 20 वर्ष एकट्याने भारताच्या समुद्र सीमांवर लक्ष ठेऊन होती.(Air India Express to Dubai Airports Suspended: दुबई मध्ये एयर इंडिया एक्सप्रेस च्या विमानांना 2 ऑक्टोबर पर्यंत नो एन्ट्री; कोरोनाबाधित प्रवासी आढळल्याने निर्णय)
भारतात येण्यापू्र्वी ब्रिटेनची रॉयल नेव्ही एचएमएस र्हिमसच्या रुपात 25 वर्ष आपली सेवा त्याने दिली होती. ब्रिटेनच्या रॉयल नेव्हीचा हिस्सा होती त्यावेळी प्रिंस चार्ल्सने या जहाजावर नौसाना अधिकाऱ्यांची आपली ट्रेनिंग पूर्ण केली होती. फॉकलँन्ड युद्धात ब्रिटिश नेव्हीसाठी या जहाजाने महत्वपूर्ण भुमिका पार पाडली होती.
विराटने देशासाठी खुप वेळा आपली महत्वाची भुमिका बजावली आहे. तर जुलै 1989 मध्ये श्रीलंकेत शांति स्थापनेसाठी ऑपरेशन ज्युपिटर मध्ये हिस्सा घेतला होता. 2001 मध्ये संसदेच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम मध्ये सुद्धा महत्वाची भुमिका पार पाडली होती. तीन दशकात आयएनएस विराटने 2252 दिवस समुद्रात घालवले आहेत. या दरम्यान 5.88 लाख नॉटिकल मील प्रवास केला होता. आयएनएस विराटचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा जगातील सर्वाधिक काळ सेवा देणारी लढाऊ जहाजाच्या रुपात दाखल करण्यात आले आहे.