IPL Auction 2025 Live

IND Vs SA ODI Series 2020: मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू ठरू शकतो दक्षिण आफ्रिकेसाठी घातक; एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता

न्यूझीलंड संघाविरोधी टी-20 मालिकेच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका विरोधी होण्याऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात येणार, अशी शक्यता आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा (IND Vs SA ODI Series 2020) यांच्यात येत्या 12 मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड संघाविरोधी टी-20 मालिकेच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका विरोधी होण्याऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात येणार, अशी शक्यता आहे. यामुळे रोहीत शर्माच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात, असाही प्रश्नही उपस्थित झाला आहे. यातच या मालिकेत मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सुर्यकुमार यादव या युवा खेळाडून चांगले प्रदेर्शन करून अनेकांचे मन जिंकली आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघासोबत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सुर्यकुमार यादवला संधी देण्यात यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. तसेच बीसीसीआयने अद्याप भारतीय संघ जाहीर केला नसून, सुर्यकुमार याची संघात निवड करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 मार्च रोजी खेळला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यात दुखापतग्रस्त रोहित शर्माही मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ नव्या कर्णधारासोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना 12 मार्चला धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे आणि दुसरा सामना 15 मार्चला लखनऊ येथे खेळण्यात येणार आहेत. तर, तिसरा आणि अंतिम सामना 18 मार्चला कोलकाता येथे पार पडणार आहे. हे देखील वाचा- ICC Women’s T20 World Cup 2020 FINAL: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याकडून भारतीय महिला क्रिकेट संघाला विजयी सल्ला

भारतीय दौऱ्या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व क्विंटन डी कॉक करणार आहे. तर, टेंबा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, फॅफ ड्यू प्लेसिस, कायले व्हेरेयने, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, ऍंडील फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, बेयूरन हेन्ड्रिक्स, ऍनरीच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज यांना संघात जागा मिळाली आहे. अद्याप भारतीय संघ जाहीर झाला नसून यात कोणत्या खेळाडूला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.