Maharashtra Murder Case: अमरावतीत उदयपूरसारखी घटना, मेडिकल मालकाची गळा चिरून हत्या; NIA कडून तपास सुरू

सध्या पोलीस त्या मास्टर माइंडचा शोध घेत आहेत.

Image used for represenational purpose (File Photo)

Maharashtra Murder Case: महाराष्ट्रातील अमरावती (Amravati) येथे 22 जून रोजी एका 50 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अमरावती पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती मेडिकल स्टोअर (Medical Store) चालवते. या व्यक्तीने नुपूर शर्माला पाठिंबा दिला होता. हे हत्येमागील कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या व्यक्तीने नुकतीच फेसबुकवर नुपूरच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती.

त्याचवेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे एक पथक आज अमरावतीत पोहोचले आहे. चारही आरोपींनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ही घटना घडवून आणल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस त्या मास्टर माइंडचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Pune: दोन मुलांची आई असलेल्या Preeti Maske ने केला विश्वविक्रम; सायकलने लेहहून मनालीला पोहोचणारी ठरली जगातील पहिली महिला)

दरम्यान, हत्येनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस हे प्रकरण फारसे बाहेर येऊ देत नाहीत. पहिल्या दिवशी पोलिसांनी हे दरोड्याचे प्रकरण असल्याचे सांगून प्रकरण दडपले. मात्र, आज एनआयए तपासासाठी पोहोचले आहे.

अमरावतीमध्ये गेल्या आठवड्यात 22 जून रोजी एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली. या व्यक्तीचे वय 50 वर्षे असून तो वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे असं या व्यक्तीचं नाव आहे. हल्लेखोरांनी कोल्हे यांच्यावर हल्ला करून त्यांचा गळा चिरला.