Flood Relief Funds For Farmers: अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात 2 हजार 297 कोटींचा निधी वितरित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येणार आहे.
Flood Relief Funds For Farmers: जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी रु.10 हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. (हेही वाचा - Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये, सरकार त्यांची नियमांनुसार काळजी घेत आहे - छगन भुजबळ)
आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी असणाऱ्या जाचक अटींमध्ये सुधारणा करणे आणि कोरोनानंतर पर्यटन विकासाला गती देण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. पीकविम्यासंदर्भात जिओ टॅगिंग सोबतच स्थानिक कृषी अधिकारी, महसूल यंत्रणेचा अहवालही गृहित धरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं यावेळी कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.