अवैध मद्य विक्री आणि वाहतूकप्रकरणी राज्यात एका दिवसात 102 गुन्ह्यांची नोंद तर 46 जणांना अटक - राज्य उत्पादन शुल्क विभाग

यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली आहे. आज एकूण 8 वाहने आणि 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात अवैध मद्य विक्री प्रकरणी 2 हजार 383 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 937 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 115 वाहने आणि 5 कोटी 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Alcohol | Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

अवैध मद्य विक्री (Illegal Alcohol Sale) व वाहतूकप्रकरणी राज्यात एका दिवसात 102 गुन्ह्यांची नोंद तर याप्रकरणी 46 जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) माहिती दिली आहे. आज एकूण 8 वाहने आणि 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात अवैध मद्य विक्री प्रकरणी 2 हजार 383 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 937 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 115 वाहने आणि 5 कोटी 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या राज्यात ऑनलाइन तसेच दुकांनामध्ये मद्य विक्रीला परवानगी नाही‌. परंतु, सोशल मीडियावर वाईन, लिकरसाठी ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल, अशा फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. मात्र, अशा जाहिरातींना बळी पडू नका, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना केलं आहे. (हेही वाचा - वाईन, लिकरसाठी ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल: या सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात कोणीही अवैध मद्य विक्री करू नये, असं आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु, तरीदेखील राज्यात अवैध मद्यविक्री सुरू आहे. लोक लॉकडाऊन काळात ऑनलाइन मद्यविक्री करत असल्याचंही उघडकीस आलं आहे. यातील अनेकांची मद्य खरेदीच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना मद्य विक्रीला बंदी असून अशा जाहिरातींना बळी पडू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.