Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांना अटक करा- देवेंद्र फडणवीस

त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणाने आता राजकीय वळण घेतल्याचे दिसत आहे.

Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

ठाणेच्या आखातीमध्ये मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणाने आता राजकीय वळण घेतल्याचे दिसत आहे. विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणात पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे (Sachin Vaze) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात सचिन वझे यांना अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच सचिन वझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असाही प्रश्न फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली आहे. ज्यात मनसुख यांच्या पत्नीने आपल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला नसून त्यांचा खून झाल्याचा दावा केला आहे. तसेच सचिन वझे यांनीच हा खून केला असावा, असाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने तक्रारीतून केली आहे. हे देखील वाचा- रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीसाठी भास्कर जाधवांच्या घरात काका-पुतण्यात चढाओढ; विक्रांत जाधव, बाळ जाधव दोघांसाठी फिल्डिंग सुरू असल्याची चर्चा

एएनआयचे ट्वीट-

मनसुख हिरेन यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत नेऊन फेकल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये मृतदेह फेकला गेला असता तर तो कधीच परत आला नसता. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता. ज्यामुळे मृतदेह परत आला आणि ही घटना उघडकीस आली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.