IMD Monsoon 2019 Predictions: 6 जूनला मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाडा सह मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पडणार पाऊस
असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Monsoon 2019 Predictions: यंदा दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्राला अजून काही दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे. यंदा 4 जूनला भारतामध्ये दाखल होणारा मान्सून यंदा 6 जूनला दाखल होईल असा नवा अंदाज भारतीय वेधशाळेकडून (India Meteorological Department) देण्यात आला आहे. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट हटावे म्हणून भगवान महाराजांचे 127 किमीचे लोटांगण (Video)
स्कायमेटच्या माहितीनुसार 4 जून दिवशी भारतामध्ये दाखल होणारा मान्सून सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र आता भारतीय हवामानखात्याच्या अंदाजानुसार, केरळच्या समुद्रकिनार्यावर 6 जूनला मान्सून धडकेल. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढच्या 6-7 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होईल. यंदा केरळमध्येच पाऊस उशिरा आल्याने महाराष्ट्रातही त्याचं आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. 'विदर्भ' आणि 'मराठवाडा' वर यंदाही दुष्काळाचे सावट, मुंबईतही कमी पावसाची शक्यता- स्कायमेट वेदर
मध्य भारतात समावेश होणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या 91 टक्के पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या 151 गावांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.