'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षासोबतच राहणार' Ajit Pawar यांनी त्यांच्या भाजपा सोबत जाण्याच्या वृत्तांवर लावला पूर्णविराम

विकासकामांसाठी आपण आज काही आमदारांना भेटलो असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही आमदाराची सही घेतलेली नाही. बैठक घेतलेली नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar | (Photo Credit - Facebook)

मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घडणार्‍या काही घटनांचा अर्थ लावताना अजित पवार (Ajit Pawar) एनसीपीला (NCP) सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली होती. 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र देखील अजित पवार यांच्याकडे असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी 'विनाकारण आपल्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत आणि जीवात जीव असे पर्यंत आपण एनसीपी सोबतच राहणार' अशी प्रतिक्रिया देत भाजपासोबत जाण्याच्या सार्‍या वृत्तांना पूर्णविराम लावला आहे.

विकासकामांसाठी आपण आज काही आमदारांना भेटलो असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कोणत्याही आमदाराची सही घेतलेली नाही. बैठक घेतलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खातरजमा न करता काही जण बातम्या देत आहेत यावरूनही अजित पवारांनी पत्रकारांना खडसावले आहे. Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनीच सांगितलं अजित पवार यांचे नेमकं चाललंय काय? बंडखोरीच्या वृत्तावर मोठे भाष्य .

महाविकास आघाडीच्या सभांमध्ये प्रत्येक पक्षाकडून 2-2 जण बोलणार असल्याने मागील सभेत आपण बोललो नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

खारघर घटनेवरून सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळा दरम्यान 11 श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यावर सरकारने हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी किंवा पुरेशी शेड्ची व्यवस्था न करता घेण्यावरून बोल सुनावले आहेत. या प्रकरणी मदत वाढवावी तसेच सरकारच्या ढिसाळ नियोजनावरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाची कारवाई करावी अशा आशयाचं पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

अजित पवारांनी त्यांच्याबद्दल उठणार्‍या वावड्यांवर बोलताना अशा गोष्टींमुळे विनाकारण सामान्य कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम निर्माण होते. सहयोगी पक्षांसोबतही गैरसमज होऊ शकतात असं बोलून दाखवले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now