IPL Auction 2025 Live

Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना

तसेच सुमित लक्ष्मण वेदवंशी (वय, 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. सुमितने योगिताचा टॉवेलने गळा आवळून खून केला. दागिन्यांवरून झालेल्या मतभेदातून आणि योगिताच्या निष्ठेबद्दलच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

(File Image)

Malabar Hill Murder Case: मुंबईतून (Mumbai) अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरातील मलबार हिल (Malabar Hill) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. योगिता सुमित वेदवंशी असं या मृत महिलेचं नाव आहे. तसेच सुमित लक्ष्मण वेदवंशी (वय, 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. सुमितने योगिताचा टॉवेलने गळा आवळून खून केला. दागिन्यांवरून झालेल्या मतभेदातून आणि योगिताच्या निष्ठेबद्दलच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसा, योगिता आणि तिचा पती कंबाला हिल हायस्कूलजवळील शिवाजी नगरमध्ये राहत होते. बुधवारी त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याचे पर्यवसान शारीरिक हाणामारीत झाले. रागाच्या भरात सुमितने टॉवेलने योगिताचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडल्यानंतर, त्याने तिला एलिझाबेथ रुग्णालयात आणले, जिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा -Ulhasnagar Shocker: 3 वर्षाच्या चिमुकलीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; 30 वर्षीय आरोपी अटकेत)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. योगिताची आई लक्ष्मी सुरेश नदाल (45) यांनी सुमितवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. लक्ष्मी यांनी सांगितले की, सुमितने योगिताचे दागिने यापूर्वी अभिषेक नावाच्या मित्राला दिले होते. यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. (हेही वाचा - Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश )

मृत महिलेच्या आईने केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तथापी, आरोपी सुमितला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. मलबार हिल पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.