शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर! खेड तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश; प्रविण दरेकर यांची माहिती
शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल, असं स्पष्ट वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. आज खेड तालुक्यातील भाजपा मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.
शिवसेनेला (Shivsena) हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर पडला आहे. शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल, असं स्पष्ट वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे. आज खेड तालुक्यातील भाजपा मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.
खेड तालुक्यातील भाजपा मेळाव्यात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेळोवेळी धर्मनिरपेक्ष सरकार असल्याचं सांगत हिंदूंशी दुजाभाव केला. अयोध्येतील विवादीत ढाचा पाडण्यात पुढाकार घेणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, असंदेखील दरेकर यांनी यावेळी म्हटलं. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच श्रीरामजन्मभूमी ट्रस्टला पत्र; राम मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींचे योगदान)
शिवसेना हिंदूत्वाशी तडजोड करत असल्याच्या कारणावरुन या शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला असल्याचंही दरेकर यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही नुकसाई भरपाई मिळालेली नाही. याशिवाय दुधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत असल्याचं सांगत प्रविण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोट ठेवलं.