Housing Market Update Q2 2025: देशभरात घरे विक्रीत घट; मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात स्थिती काय?
PropEquity च्या अहवालानुसार, भारतातील प्रमुख शहरांमधील घरांची विक्री 2021 नंतर प्रथमच Q2 2025 मध्ये 1 लाख युनिटच्या खाली आली आहे, विक्री 19% आणि पुरवठा 30% खाली आहे.
Mumbai Property Sales: देशातील प्रमुख 9 शहरांमध्ये एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत घरांची विक्री (Housing Sales Q2 2025) एक लाख युनिट्सच्या खाली आली आहे. ही स्थिती Q3 2021 (जुलै-सप्टेंबर) नंतर प्रथमच निर्माण झाली आहे, असे PropEquity या NSE-सूचीत रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एप्रिल-जून 2025 या कालावधीत घरांची विक्री (Home Buying India 2025) 19% ने घटून 94,864 युनिट्स झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत 116,432 युनिट्स होती. याच कालावधीत नव्या पुरवठ्यातही 30% घट झाली असून एकूण 82,027 युनिट्स लाँच करण्यात आल्या, जी संख्या एप्रिल-जून 2024 मध्ये 117,208 युनिट्स होती.
शहरानुसार घरांच्या विक्रीत घट
9 पैकी 7 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यापैकी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये सर्वाधिक 34% घट झाली. दिल्ली-NCR (16%) आणि चेन्नई (9%) ही दोनच शहरे अशी आहेत जिथे विक्रीत वाढ नोंदली गेली.
पुरवठ्याच्या बाबतीत 6 शहरांमध्ये घट झाली असून मुंबईमध्ये सर्वाधिक 61% घट झाली आहे. मात्र, दिल्ली-NCR (37%), हैदराबाद (19%) आणि चेन्नई (6%) या शहरांमध्ये नव्या प्रकल्पांचा पुरवठा वाढला आहे. (हेही वाचा, New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ)
तज्ज्ञ काय सांगतात?
PropEquity चे संस्थापक आणि CEO समीर जसुजा म्हणाले, “Q3 2021 नंतर प्रथमच विक्री 1 लाख युनिट्सच्या खाली आली आहे. मुंबई, बेंगळुरू आणि नवी मुंबई या शहरांमध्ये 2023 आणि 2024 मध्ये विक्रीचा उच्चांक गाठल्यानंतर आता स्थिरीकरण दिसून येत आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “दिल्ली-NCR मध्ये या तिमाहीत घसघशीत वाढ झाली असून त्यामागे गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडा येथील नव्या पुरवठ्याचे योगदान आहे.”
तिमाही आधारावर (Q-o-Q) विचार केला असता, 9 प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 10% घट झाली आहे, तर पुरवठ्यात 2% वाढ झाली आहे. चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि दिल्ली-NCR या शहरांमध्ये नव्या प्रकल्पांचा पुरवठा वाढला आहे, तर चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली-NCR येथे विक्रीत वाढ झाली आहे. हा अहवाल देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात स्थैर्याच्या दिशेने होत असलेली हालचाल दर्शवतो, जिथे मागील वर्षांतील तेजीत असलेली शहरे आता सामान्य गतीने स्थिरावत आहेत, तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झालेल्या शहरांमध्ये नवीन वाढ दिसून येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)