कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 11 हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करणार - अनिल देशमुख
राज्यातील 60 जेलमध्ये 38 हजार कैदी होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आतापर्यंत 9 हजार 671 कैद्यांना सोडण्यात आले आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यातील 11 हजार कैद्यांची (Prisoners) पॅरोलवर (Parole) सुटका करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. राज्यातील 60 जेलमध्ये 38 हजार कैदी होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आतापर्यंत 9 हजार 671 कैद्यांना सोडण्यात आले आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
याशिवाय कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी 24 जिल्ह्यात 31 कारागृहाची तात्पुरती स्थापना करणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. यापूर्वीदेखील राज्यातील विविध कारागृहातील कैद्यांची कोरोना संसर्गाच्या धास्तीने पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra Updates: महाराष्ट्रात आज कोरोनाच्या नव्या 3007 रुग्णांची भर तर 91 जणांचा बळी, राज्यातील COVID19 चा आकडा 85 हजारांच्या पार)
राज्यातील कारागृहातून आतापर्यंत तब्बल 10 हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. तर उर्वरित कैद्यांनाही लवकरच सोडलं जाणार आहे. आज अनिल देशमुख यांनी पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहातील कोवीड सेंटरला भेट दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी कर्तव्यावर असलेले पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच त्यांचे कौतुक केले.