पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात हिटलरचा पुनर्जन्म झाला आहे- जितेंद्र आव्हाड
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विरोधीपक्षातील नेत्यांकडून विरोध दर्शवला जात आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात देशभरातून अंदोलन केली जात असून राजकीय वातावरणदेखील तापले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विरोधीपक्षातील नेत्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. यातच औरंगाबाद येथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानंतर केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया कायदा आणणार असल्याची माहिती आव्हाड यांनी त्यावेळी दिली. यामुळे मोदींच्या रुपाने हिटलरचा पूनर्जन्म झाला असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू झाल्यानंतर संपूर्ण देशातून या कायद्याचा निषेध केला जात आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यानंतर केंद्र सरकार लवकरच सोशल मीडिया कायदा आणणार असल्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्या भाषणातून केली आहे. देशात स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात लढाई आहे. मुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदुंना गाफीस ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात 14 लाख हिंदु बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. तसेच महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे नाहीत. त्यामुळे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा त्यांनाही फटका बसणार आहे. हे देखील वाचा- महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरु आहे- चंद्रकांत पाटील
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी नव्या कायद्याचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे संपूर्ण जनतेचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. नागरीकत्व कायद्यानंतर केंद्र सरकार सोशल मीडिया कायदा आणणार आहेत. हा कायदा लागू झाल्यानंतर तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले याची माहिती नरेंद्र मोदी यांना समजणार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्या रुपात हिटलरचा पूनर्जन्म झाला आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.