Maharashtra Rain Update: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला, तिघांचा बुडून मृत्यू
ही घटना जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील परमेली येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, पेरमेली नाल्याला आलेल्या पूरात हा ट्रक वाहून गेला. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (9 जुलै) रात्री घडली.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाणारा ट्रक नाल्यात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील परमेली येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, पेरमेली नाल्याला आलेल्या पूरात हा ट्रक वाहून गेला. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (9 जुलै) रात्री घडली. घटनेची माहिती कळताच प्रशासनाने एसडीआरएफच्या पथकामार्फत शोधमोहीम हाती घेतली आहे. शोधमोहीमेतील पथकाला नाल्यात एक ट्रक आढळून आला. त्यात तिघांचे मृतदेहसुद्धा सापडले. गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही पावसाची संततधार (Gadchiroli Rain 2022) कायम आहे. (Maharashtra Rain Update)
राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओसांडून वाहात आहेत. अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर पावसाने काहीसा अधिकच जोर धरला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीतूनच ट्रक वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुुसळधार पावसाचा सुमारे 130 गावांना बसला तडाखा)
दरम्यान, सांगितले जात आहे की, पूरात वाहून गेलेल्या ट्रकमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरीत प्रवाशांचा शोध सुरु आहे. उर्वरीत लोक हे सुरक्षीत आहेत की त्यांच्यासोबतही काहीअप्रिय घटना घडली आहेत. याबाबत एसडीआरएफ पथक शोध घेत आहेत. गावपातळीवर सक्रीय असलेल्या यंत्रणांनीही याबाबत शोधमोहीम सुरु केली आहे. दरम्यान, हा ट्रक नेमका कोणाचा आहे. तो कोठून कोठे निघाला होता याबाबतही माहिती मिळू शकली नाही.
ट्विट
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते भामरागडया राष्ट्रीय महारमार्गावरील कुमरगुडा आणि पेरमिली नाल्यावर पूरस्थितीनिर्माण झाल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तशी माहितीही प्रशासनाने दिली होती. दरम्यान, गडचिरोलीत अतिवृष्टी झाली. त्यात पेरमिलीच्या नाल्यात जितेंद्र दोडके (४०) नामक एमएसईबीचा कर्मचारी (लाईनमन) हे दोघे पुरात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले. अद्यापही या भागात पाऊस सुरुच असून नदी-नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे.