Heavy Rains In Pune: मुसळधार पावसाने पुण्यात कहर, आधारवाडीत दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू, दोन जखमी
पुण्यातील (Pune) पावसाने (Rains) जनजीवन विस्कळीत केली आहे. पुण्याती आधारवाडीत एक दुर्घटना घडली आहे. येथे दरड कोसळल्याने दोन- तीन तरुण जखमी झाले
Heavy Rains In Pune: महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील (Pune) पावसाने (Rains) जनजीवन विस्कळीत केली आहे. पुण्याती आधारवाडीत एक दुर्घटना घडली आहे. येथे दरड कोसळल्याने दोन- तीन तरुण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या पुण्यात अति मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे काही घरात पाणी साचले आहे. खबरदारी म्हणून प्रशासन नागरिकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवत आहे. (हेही वाचा- पुण्याच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली Raigad-Pune रस्ता वाहतूकीसाठी बंद
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आधारवाडीत गावात दरड कोसळली. या घटनेत तीन तरुण जखमी झाले आणि एकाचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे गावात जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना)
पुण्यातील मुठा नदीवरील जेड पुलाजवळ आज पहाटे तीनच्या सुमारास विजेचा धक्का लागून १८ ते २५ वयोगटातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली त्यामुळे परिसरात पाणी साचले. त्यावेळी ते अंडा बुर्जीचा स्टॉलला वाचवण्यासाठी गेले होते त्यावेळी विजेचा धक्का लागून हा अपघात घडला.