Heart Transplant Patient Dies: मुंबईच्या KEM Hospital मधील पहिल्या हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णाचा 40 दिवसांनंतर मृत्यू; शस्त्रक्रियेनंतर झाला संसर्ग

नंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना संसर्ग झाला आणि तो लवकरच तीव्र तापात विकसित झाला.

KEM Hospital (Photo Credits-Facebook)

Heart Transplant Patient Dies: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संचालित केईएम रुग्णालयाने (KEM Hospital) जुलैमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत, ते हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplant Surgery) करणारे देशातील पहिले महापालिका रुग्णालय ठरले. महेश पडव (38) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होते. मात्र आता माहिती मिळत आहे की, शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीनंतर, हृदय प्राप्तकर्ता महेश पडव यांचा ऑपरेशन झाल्यानंतर 40 दिवसांनी मृत्यू झळा आहे. पडव यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. केईएम रुग्णालयात 12 जुलै रोजी पडव यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अहवालानुसार, पडव शस्त्रक्रियेनंतर 20 दिवस केईएम रुग्णालयात होते, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. नंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. मात्र, तिथे त्यांना संसर्ग झाला आणि तो लवकरच तीव्र तापात विकसित झाला. 22 ऑगस्टला डिस्चार्जनंतरच्या संसर्गामुळे पडव यांचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. या घटनेमुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी डिस्चार्जनंतरच्या काळजीबद्दल चिंता वाढली आहे. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेपूर्वी एक महिन्यापूर्वी पडव यांना हृदयविकाराच्या स्थितीमुळे केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा: Mumbai Rabies Eradication Project: बीएमसी कडून 28 सप्टेंबर पासून राबवली जाणार 'रेबिजमुक्त मुंबई' साठी खास लसीकरण मोहिम)

34 वर्षीय दात्याने हृदय दान केल्यामुळे पडव यांच्यावर प्रत्यारोपण शक्य झाले. 12 जुलैच्या मध्यरात्री ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर होती. 1963-64 मध्ये केईएमच्या हृदय प्रत्यारोपणाच्या सुरुवातीच्या प्रयत्नानंतर हा मैलाचा दगड ठरला, आता जो अयशस्वी ठरला. ऑक्टोबर 2023 मध्ये नागरी संचालित रुग्णालयाला हृदय प्रत्यारोपणासाठी तात्पुरता परवाना मिळाला, जो नंतर डिसेंबरमध्ये पूर्णपणे मान्यताप्राप्त झाला. दरम्यान, 49 डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी असे अनेक डॉक्टर होते जे 24 तास जागे होते, तर काही फक्त 1 ते 2 तासांच्या झोपेने हॉस्पिटलमध्ये राहिले. साधारण 12 तास ही शाश्त्राक्रीया चालली. मात्र आता रुग्नालाच्या हृदय प्रत्यारोपणाचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला.