रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 4 सदस्यीय समिती गठीत; राजेश टोप यांची माहिती
विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला 10 दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध 'रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या' किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 4 सदस्यीय समिती (4 Member Committee) गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला 10 दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा.डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात शनिवारी आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 7,827 नवे कोरोना रुग्ण, तर 173 जणांचा मृत्यू)
समितीचे कार्य -
आयसीएमआरने रॅपीड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वचं किंवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे. (हेही वाचा - Covid19 Cases In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; दिवसभरात 1 हजार 263 नव्या रुग्णांची नोंद, 44 जणांचा मृत्यू)
या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की, निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करावी. शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करावा.