Harbour Train Delay: वाशी जवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने

हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Mumbai Local Train | (File Image)

आज सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांना मुंबई लोकलच्यामुळे (Mumbai Local) मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी लोकल गेल्या 30 मिनिटांपासून रखडली आहे. वाशीजवळ (Vashi) ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजही AC मुंबई लोकलच्या काही फेर्‍या तांत्रिक त्रृटींमुळे Non AC धावणार; इथे पहा वेळापत्रक)

पाहा पोस्ट -

मानखुर्द रेल्वे स्थानकावर गेल्या 30 मिनिटांपासून रेल्वे थांबली असून कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. मानखुर्द ते वाशी रेल्वेसेवा गेल्या 30 मिनिटांपासून स्थगित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वे गेल्या अर्धातासाहुन अधिक कालापासून मानखुर्द रेल्वे स्थानकावर थांबली आहे. सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या नागरिकांना यामुळे नाहक त्रास हा सहन करावा लागत आहे.

वाशीजवळ सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेतील बिघाड कधी दुरुस्त केला जाईल आणि रेल्वेसेवा पुन्हा पूर्वपदावर कधी येणार याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामुळे नागरिकांमध्ये देखील संताप पहायला मिळत आहे.