GST Fraud: मेसर्स जिरावला मेटल्सचे मालक प्रवीण गुंदेचा यांना जीएसटी घोटाळा प्रकरणी अटक

या व्यवसायिकाने 41 कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट बिलांवरून 7.38 कोटी रुपयांच्या कथित बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाने (Maharashtra State GST Department) मोठी कारवाई करत पुणे (Pune) येथील एका व्यवसायिकास अटक केली आहे. या व्यवसायिकाने 41 कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट बिलांवरून 7.38 कोटी रुपयांच्या कथित बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. प्रवीण गुंदेचा (Pravin Gundecha) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते एका खासगी धातू कंपनीचे मालक असल्याची माहिती जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जीएसटी विभागातील धिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी अधिकारी नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करत होते. या वेळी या अधिकाऱ्यांना विभागाला मेसर्स जिरावला मेटल्स (M/s Jirawala Metals) कंपनीच्या नावे 41 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे संशयास्पद व्यवसाह आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जीएसटी, पुणे विभागाच्या तपास पथकाने, जिरावाला यांच्या पुणे येथे असलेल्या (करदात्याच्या) व्यावसायिक परिसरास भेट देऊन 12 एप्रिल रोजी तपासणी केली. (हेही वाचा, Theft: ठाणे अँटी इव्हेशन विंगकडून 12.23 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवणाऱ्या जोडप्याला अटक)

जीएसटी विभागाने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे, प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तपासणी वेळी, असे आढळून आले की या कंपनीच्या करदात्याच्या पुरवठादारांनी दिलेली वीज बिले आणि बनावट कागदपत्रे यांद्वारे जागा मालकांच्या माहितीशिवाय परवाना करार करून GST नोंदणी मिळवली होती," असे आढळून आले. पत्रकात पुढे म्हटले आहे की, करदात्याने कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता चक्क 41 कोटी रुपयांच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या खरेदी केल्या आहेत आणि अशा प्रकारे 7.38 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेतला आहे, असे आढळून आले आहे. त्यामुळे कंपनीचे मालक गुंदेचा यांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे विभागाने सांगितले.