शासकीय पदभरतीसाठी egrampanchayat.com वेबसाईटच्या संदर्भातील जाहिरात खोटी, PIB महाराष्ट्र यांच्याकडून खुलासा

देशभरात कोरोनाची परिस्थिती असताना काही खोट्या बातम्या सोशल मीडियात फार वेगाने परसत आहेत. याच पार्श्वभुमीवर मागील गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून सोशल मीडियात ई-ग्रामपंचायत प्रकल्पासंदर्भात बदनामी केली जात आहेत. तसेच या प्रकल्पाचा संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याशी जोडला जात असूव सोशल मीडियात याबाबत माहिती देण्यात येत आहे.

शासकीय पदभरतीसाठी egrampanchayat.com वेबसाईटच्या संदर्भातील जाहिरात खोटी, PIB महाराष्ट्र यांच्याकडून खुलासा
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

देशभरात कोरोनाची परिस्थिती असताना काही खोट्या बातम्या सोशल मीडियात फार वेगाने परसत आहेत. याच पार्श्वभुमीवर मागील गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून सोशल मीडियात ई-ग्रामपंचायत प्रकल्पासंदर्भात बदनामी केली जात आहेत. तसेच या प्रकल्पाचा संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याशी जोडला जात असूव सोशल मीडियात याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह संस्थांनी अशा पद्धतीच्या कोणत्याही चुकीचा पाठपुरावा करु नये. तसेच शासकीय पदभरतीसाठी egrampanchayat.com वेबसाईटचा संदर्भातील जाहिरात खोटी असल्याचा खुलासा PIB महाराष्ट्र यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासन ग्रामविकास यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पदभरती बाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवडसमिती अशाप्रकारे कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. तसेच प्रकल्प व्यवस्थापक, ई- ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे या जाहिरातीमधून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करत आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (Covid 19 रुग्णांसाठी BEST Buses चे अॅम्ब्युलन्स मध्ये रुपांतर; मुंबई मधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे BMC चे महत्त्वपूर्ण पाऊल)

सोशल मीडियात या पदांसदर्भात माहिती देणाऱ्यांच्या विरोधात शासनाच्या वतीने पोलिसात तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संदर्भात कार्यवाही सुद्धा करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. मात्र खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2020 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).