Mumbai Local: लोकल ट्रेनमधून तरुणीचा मोबाईल आणि सोनसाखळी चोरीला, आरोपीला कल्याण स्थानकावरून अटक
माटुंगा ते कसारा प्रवास करणाऱ्या तरुणीच्या पर्समधून महागडा मोबाईल आणि सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिस सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे.
Mumbai Local: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Local Train) चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. माटुंगा ते कसारा प्रवास करणाऱ्या तरुणीच्या पर्समधून महागडा मोबाईल आणि सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिस सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मोबाईल आणि सोनसाखळी जप्त केले आहे. पोलिसांनी महिलेला चोरी झालेले सामान परत केले आहे. (हेही वाचा- शेतकरी कुटुंबाच्या घरात दरोडा, 30 लाख रुपयांसह 20 तोळे सोने चोरले
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील संभाजीनगर येथील रहिवाशी श्वेता शिंदे यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी लोकल ट्रेनमध्ये झाले. ती मांटूगा येथे काम करते. गेल्या आठवड्यात ऑफिस सुटल्यानंतर ती माटूंगा स्टेशनवरून कसारा जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. त्यांना ठाण्यात उतरायचे होते, पण खिडकीजवळच्या सीटीवर बसून ती गाढ झोपेत होती. ट्रेन कसारा रेल्वे स्थानकावर पोहोचली, त्यावेळीस त्यांच्या गळातील सोनसाखळी आणि हातातील मोबाईल चोरली आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
श्वेता तात्काळ कल्याण स्टेशनला पोहोचली आणि स्टेशनवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्याचवेळी आरपीएफने आशिष मकासरे याला कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून एक महागडा मोबाईल आणि सोन्याची चैन ताब्यात घेतली. यानंतर रेल्वे पोलीस आरोपी आशिषला घेऊन श्वेताकडे पोहोचले. श्वेताने मोबाईल आणि सोनसाखळी ओळखली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून श्वेताचा मोबाईल आणि सोनसाखळी तिला परत केली. चोरीच्या घटनेनंतर लोकल ट्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.