Girl Molested In Ahmednagar : नगर जिल्ह्यात दिवसाढवळ्या रस्त्यावर मुलीची छेडखानी,व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी पोलीसांच्या ताब्यात

हे वियनभंगाचे कृत्य कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेतील आरोपीला पोलीसांना पकडण्यास यश मिळाले आहे. पोलीसांना आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यावर कारवाई चालू आहे.

Girl Molested In Ahmednagar: Photo credit Tiwtter

Girl Molested in Ahmednagar : महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध दिवसाढवळ्या एका मुलीचा विनयभंग करताना एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, देशभरात संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. रफिक पठाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अधिकाऱ्यांनी तातडीने पकडले आहे, त्याने अशा विनयभंगच्या प्रकरणात त्याच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.

ही घटना सोमवारी सकाळी अहमनगर जिल्ह्यात घडली आहे. भररस्त्यात एका अनोळखी व्यक्तीने मुलीवर जबरदस्ती केल्याचे घटना घडून आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडिओत मुलीचा आक्रोश ऐकायला येत आहे. मला वाचवा अश्या किंचाळ्या ऐकायला येत आहे.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">A girl molested openly in broad daylight in ahmednagar area of Maharashtra; Rafik pathan arrested<a href="https://t.co/yZ6MM52ILr">pic.twitter.com/yZ6MM52ILr</a></p>&mdash; Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) <a href="https://twitter.com/MeghUpdates/status/1675823934611275776?ref_src=twsrc%5Etfw">July 3, 2023</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

व्हायरल झालेला या व्हिडिओमुळे तातडीने पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या धक्कादायक कृत्यांमुळे संपुर्ण अहमदनगर आणि राज्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीसांना वचनवध्दता दर्शवली आहे. ह्या धक्कादायक घटनेमुळे समाजात पुन्हा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.