Girish Mahajan On Maratha Reservation: "मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत", मंत्री गिरीश महाजनाच्या वक्तव्याने सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. .
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वाद हा पेटला आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याची मागणी ही करण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत, ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केल्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.कोणत्या कायद्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसं देणार? असा सवाल देखील महाजन यांनी उपस्थित केला असून ते संगमनेरमध्ये बोलत होते. त्यांच्या या वकत्व्यानंतर गिरीश महाजनांनी चुकीचे वक्तव्ये करू नयेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. विनाकारण मराठ्यांना नडू नका, अन्यथा त्यांच्या आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू असा इशारा मराठा नेता मनोज जरांगे यांनी दिला आहे. (हेही वाचा - Policeman Eating On Bike Video: नाशिकमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याने मोटरसायकलवर डब्बा ठेऊन केलं जेवण, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी करताय अधिकाऱ्याला सलाम)
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल असा विश्वास संगमनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. . सु्प्रीम कोर्टातूनच मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.