FYJC Bifocal Merit List 2019: आज संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन जाहीर होणार बायफोकल ची पहिली मेरीट लिस्ट
आज बायफोकल विषयांची मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. वेबपोर्टलवर संध्याकाळी 6 वाजता यादी जाहीर होणार आहे.
FYJC Merit List 2019 Date & Time: महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डचा दहावीचा निकाल (SSC Result 2019) जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशप्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे. आज महाराष्ट्रातील ज्युनियर कॉलेजामध्ये बायफोकल विषयांच्या (FYJC Bifocal Merit List) विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या वेब पोर्टलवर संध्याकाळी सहा वाजता यादी जाहीर होणार आहे. Update: FYJC Bifocal Merit List 2019: आज रात्री 8 वाजताच्या नंतर ऑनलाईन जाहीर होणार
ज्या विद्यार्थ्यांनी वेबपोर्टलवर पार्ट 1 आणि पार्ट 2 यशस्वीरित्या भरला आहे. त्यांना सेंट्रलाईज्ड अॅडमिशन प्रोसेसनुसार त्यांची नावं यादीमध्ये पाहता येणार आहेत.ज्या विद्यार्थ्यांची आजच्या बायफोकल यादीमध्ये नावं जाहीर होणार त्यांच्यासाठी कागदपत्रांची छाननी, प्रवेश शुल्क भरण्यासाठी 26 आणि 27 जूनपर्यंत अवधी देण्यात आला आहे. FYJC Admissions 2019: 11 वी प्रवेशप्रक्रिया सुरू; mumbai.11thadmission.net वर कशी पहाल Provisional आणि General Merit List 2019
इथे पहा पहिली मेरीट लिस्ट
mumbai.11thadmission.net
बायफोकलनंतर पहिली जनरल मेरीट लिस्ट 6 जुलै दिवशी संध्याकाळी सहा वाजता वेबपोर्टलवर जाहीर होणार आहे. यंदा 8 जूनला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अंतर्गत मार्कांच्या गोंधळावरून 11वीची प्रवेशप्रक्रिया रेंग़ाळली होती. 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, एका क्लिक वर जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक
11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी दुसरी मेरीट लिस्ट 15 जुलैला जाहीर होणार आहे. तर तिसरी यादी 23 जुलै आणि चौथी व अंतिम यादी 31 जुलैला जाहीर होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये 70% जागा भरल्यानंतर यंदाचे 11 वी चे वर्ग सुरू होणार आहेत. अंतर्गत मार्कांच्या गोंधळामुळे यंदा राज्य सरकारने तुकड्यांच्या संख्या वाढवल्या आहेत.