FYJC Admissions 2022-23: 11वी प्रवेशासाठी Non-Creamy Layer सर्टिफिकेट सादर करायला विद्यार्थ्यांना मिळणार 3 महिन्यांची मुदत

आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट साठी अर्ज केल्याचं प्रमाणपत्र किंवा त्याचा रिसीट क्रमांक देऊन आपली शाळा किंवा ज्युनियर कॉलेज मधील सीट रिझर्व्ह करता येणार आहे.

Representational Image (Photo Credits: Sarkari Niyukti/ Facebook)

दहावी निकालांनंतर आता राज्यात 11वी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. उद्या, 3 ऑगस्टला पहिली प्रवेश यादी लागणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. VJ-NT, OBC आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी Non-Creamy Layer सर्टिफिकेट देण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. The Centralised Admission Process कडून जारी नोटिफिकेशन मध्ये जर विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव प्रवेशाच्या वेळेस नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट देऊ शकला नाही तरीही त्याला रिझर्व्ह सीट साठी अर्ज करता येणार आहे.

आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट साठी अर्ज केल्याचं प्रमाणपत्र किंवा त्याचा रिसीट क्रमांक देऊन आपली शाळा किंवा ज्युनियर कॉलेज मधील सीट रिझर्व्ह करता येणार आहे. नक्की वाचा: कसं असेल यंदाचं 11वी प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक?

secondary and higher secondary education चे संचालक महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश प्रक्रियेत सहभागि झाल्यानंतर 3 महिन्यात विद्यार्थ्यांना आपलं नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट सादर करावं लागेल. ते सर्टिफिकेट न दिल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाईल.

कॅप कमिटीने दिलेल्या माहितीनुसार जर काही कारणास्तव त्या विशिष्ट वर्षासाठी जर नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट मिलाले नाही तर विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गात अ‍ॅडमिशन घ्यावं लागेल.

विद्यार्थ्यांना त्यांची सर्टिफिकेट्स ऑनलाईन सादर करण्याची मुभा असेल. ती ऑनलाईनच व्हेरिफाईड देखील होतील. त्यासाठी facilitation centre मध्ये जाण्याची गरज नाही. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी झाली आहे की नाही? याची मात्र खातरजमा करून घ्यावी लागणार आहे.