FYJC Admission 2021: 11वीच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशांना मुदतवाढ; आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित करता येईल प्रवेश!
11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मेरीट लिस्ट जाहीर होताच पाहता येणार आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार 10वी, 12वीचे निकाल लागल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची रस्सीखेच सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई सोबतच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर मध्ये 11 वी प्रवेशांसाठी (FYJC Admission) विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र देऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. यंदा त्यासाठी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 ऑगस्ट ऐवजी आता 31 ऑगस्ट म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या यादीनुसार प्रवेश निश्चित करता येणार आहेत. नक्की वाचा: FYJC Admission 2021-22: विद्यार्थ्यांना POEAM App च्या माध्यमातून इयत्ता आकरावीत घरबसल्या प्रवेश.
आवश्यक कागदपत्रांबाबत नियमावली
ओपन कॅटेगरी मधून प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला जात प्रवर्गाची कागदपत्र देण्याची गरज नाही.
जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केलेल्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि अर्ज केल्याची पावती सादर करूनही प्रवेश निश्चित करता येणार.
स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अर्ज केल्याची पावती देखील नाही अशांना वडीलांच्या जात प्रमाणपत्रावर, हमीपत्रावर प्रवेश निश्चित करता येईल.
दरम्यान हमीपत्र किंवा अर्ज दाखल केल्याची पावती दिलेल्यांना 30 दिवसांत त्यांचे जात प्रमाणपत्र दाखल करावं लागेल अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो.
दरम्यान आज 11वी प्रवेशासाठी दुसरी प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट, कट ऑफ लिस्ट जाहीर केली जाणार आहे. 11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना मेरीट लिस्ट जाहीर होताच पाहता येणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरी प्रमाणेच दुसर्या फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी, कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ दिला जाईल.