Ganpati Visarjan 2022: मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून पाच दिवसांच्या गणपती विसर्जन जय्यत तयारी
गणेश चर्तुर्थीनंतर आज भक्तांना गणरायांना पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे.
Ganpati Visarjan 2022: आज मुंबईसह राज्यभरात पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन (Ganpati Visarjan) होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह (Mumbai) राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील चौपाटी आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त (Police Arrangements) तैनात करण्यात आला आहे. गणेश चर्तुर्थीनंतर आज भक्तांना गणरायांना पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. अनेकजण आपल्या घरी किंवा मंडळात पाच दिवसांच्या गणपतीची स्थापना करतात. त्यामुळे आज विसर्जनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी आज मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
दरम्यान, बीएमसीनेदेखील पाच दिवशीय गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. महानगरपालिकेकडून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2022: मुंबईच्या बेस्ट मधून प्रवास करणारा गणपती बाप्पा, प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा हा देखावा; पहा फोटो)
याशिवाय आज मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेने मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी केली असून मुंबई पोलिसांकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.