NDA मध्ये ऐतिहासिक पदवी प्रदान सोहळा संपन्न; 17 महिला कॅडेट्सची पहिली बॅच झाली पदवीधर (Watch Video)
आजच्या 148 व्या कोर्स मधील परेडला Academy cadet captain, Udayveer Negi यांंनी कमांड केले.
National Defence Academy च्या पदवी प्रदान सोहळ्यात यंदा पुरूषांसोबतच पहिल्यांदा 17 महिलांची तुकडी पास आऊट झाली आहे. आज 30 मे दिवशी हा शानदार सोहळा पार पडला आहे. महिला कॅडेट्स सोबतच 300 पुरूष अशी ही पहिलीच co-ed batch पास आऊट झाली आहे. “Cradle of Leadership” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकवासला येथील TRI Service Training Academy च्या Khetrpal Parade Ground वरील ‘Antim Pag’ कॅडेट्सनी पार केले. माजी आर्मी चीफ Gen. V.K. Singh हे या पासिंग आऊट परेड चे रिव्हुईंग ऑफिसर्स होते.
UPSC ने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना डिफेंस अकॅडमी मध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिल्यानंतर 2022 ची ही 148 वी बॅच आहे ज्यामध्ये पहिल्यांदा महिला कॅडेट्स पासआऊट झाल्या आहेत. नक्की वाचा: NDA मध्ये जाण्यास इच्छुक महिला उमेदवारांना नाशिकमध्ये मिळणार खास प्रशिक्षण, राज्य सरकारचा शासकीय ठराव मंजूर.
National Defence Academy मधून पासआऊट झाल्या पहिल्या 17 महिला कॅडेट्स
आजच्या 148 व्या कोर्स मधील परेडला Academy cadet captain, Udayveer Negi यांंनी कमांड केले. Gen. Singh यांनी यावेळी बोलताना, अकॅडमीसाठी आजचा दिवस हा खास असल्याचं म्हटलं आहे. अधिक समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने आपल्या सामूहिक प्रवासात हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
"या तरुणी 'नारी शक्ती'चे प्रतीक आहेत, ज्या केवळ महिला विकासाचेच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक आहेत," असे ते म्हणाले. "मी अशा भविष्याची कल्पना करतो, की या तरुणींपैकी एक महिला त्या ज्या सेवेत जातात त्या सर्वोच्च पदांवर पोहोचेल आणि हा दिवस आता दूर नाही" असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.