मुंबईच्या रस्त्यांवर 21 फेब्रुवारी पासून धावणार पहिली Electric AC Double-Decker Bus; पहा या बसची फीचर्स, तिकीट, वेळ
डिजिटल तिकीटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, लाईव्ह ट्रॅकिंग़, डिजिटल डिस्प्ले, पॅनिक बटण च्या सुविधा या एसी बस मध्ये असणार आहेत.
मुंबईची शान असणारी डबल डेकर बस आता नव्या रूपात पुन्हा नागरिकांच्या भेटीला येणार आहे. आता ही डबल डेकर बस एसी आणि इलेक्ट्रिक झाली आहे. भारतातील पहिली एसी डबलडेकर बस (AC Double Decker Bus) मुंबई (Mumbai) मध्ये 21 फेब्रुवारी पासून धावणार आहे. BEST कडून ही बस चालवली जाणार आहे. दरम्यान सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) ते एनसीपीए (NCPA) या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी 8.45 ते रात्री 10.30 या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी रूट नंबर 115 असणार आहे. या एसी डबलडेकर बसचं (AC Double Decker Bus) भाडं देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे. पहिल्या 5 किमी साठी केवळ 6 रूपये आकारले जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अशा 200 बस उतरवण्याचा मानस आहे.
National clean air Programme अंतर्गत या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. 14 फेब्रुवारीला या बसच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बसद्वारा मुंबईकरांना वर्ल्ड क्लास ट्रॅव्हलचा अनुभव मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
डबल डेकर बसची फीचर्स
बेस्टच्या या नव्या डबल डेकर एसी बस Switch Mobility EiV 22 आहेत. यामध्ये अॅडव्हान्स Lithium-ion NMC chemistry वापरण्यात आली आहे. यामधील बॅटरीची क्षमता 231 kWh आहे. सोबतच लिक्विड कुलिंग वापरण्यात आले आहे. यामधील बॅटरी दीड तास ते 3 तासाच्या कालावधीमध्ये चार्ज होईल. तर एकदा चार्ज केलेल्या बॅटरी वर बस 250 किमी प्रवास करू शकणार आहे.
बेस्टची ही बस Switch Mobility's facility च्या रायगड मधील पाताळगंगा मध्ये बनवण्यात आली आहे. या बस मध्ये काही अॅडव्हान्स फीचर्स आहेत ज्यामध्ये डिजिटल तिकीटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, लाईव्ह ट्रॅकिंग़, डिजिटल डिस्प्ले, पॅनिक बटण असणार आहे. या बसमध्ये 65 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तर उभ्याने प्रवास करणार्यांची संख्या पहिली तर एकूण 100 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत.