Mumbai CSMT FOB Collapse: मध्य रेल्वे, BMC अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने 5 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.
CST Bridge Collapse: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (Chhatrapati Shivaji Terminus) परिसरात काल संध्याकाळी टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगला जोडणारा पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा हकनाक बळी गेला आहे. तर 36 जखमींवर उपचार सुरू आहेत. मागील वर्षभरात मुंबईमध्ये ब्रिज कोसळण्याची तिसरी घटना आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईकर आणि मृतांच्या परिवारातील लोकांना संताप व्यक्त केला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासन एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत जबाबदारी झटकत होते. मात्र रात्री उशिरा आझाद मैदान पोलिस स्ठानकामध्ये (Azaad Maidan Police Station) या दुर्घटनेबाबत FIR दाखल करण्यात आलं आहे. CSMT Bridge Collapse: पूल दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सीएसएमटी पूल कोसळल्याची जबाबदारी कोणाची?
सीएसएमटी परिसरात पादचारी पूलाचा काही भाग कोसळल्यानंतर मध्य रेल्वेचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल (कलम 304A) करण्यात आला आहे. हा गुन्हा आझाद मैदान पोलिस स्ठानकामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सीएसएमटी जंक्शन आणि जे.जे. फ्लायओव्हर परिसरातील वाहतूक बंद, 'या' पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं Mumbai Police चं मुंबईकरांना आवाहन
सीएसएमटी परिसरामध्ये रेल्वे स्थानक ते टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग यांना जोडणारा पूलाचा भाग कोसळला. सिमेंटचा भाग कोसळल्याने ब्रीजवरील पादचारी थेट खाली कोसळले. यामध्ये जीटी रूग्णालयाच्या नर्स आणि सामन्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने 5 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.