Dadaji Bhuse: '50 खोके एकदम ओके' म्हणत शेतकरी आक्रमक; मंत्री दादा भूसे यांच्या कार्यक्रमात राडा, काळे झेंडेही दाखवले

दादा भुसे हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी नाराज शेतकरी आक्रमक (Farmers Protest) झाले. या आक्रमक शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवले. शिवाय '50 खोके एकदम ओके' अशा घोषणाही दिल्या.

Dada Bhuse (Photo Credit - Twitter)

शिवसेनेत (Shiv Sena) बंड करुन एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना आज धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. दादा भुसे हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी नाराज शेतकरी आक्रमक (Farmers Protest) झाले. या आक्रमक शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवले. शिवाय '50 खोके एकदम ओके' अशा घोषणाही दिल्या. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला नेले. त्यानंतर ताण काहीसा निवळला. साक्री तालुक्यातील कासारे (Kasare Village) गावात ही घटना घडली.

दादा भुसे हे महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री होते. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारमध्ये बंदरे व खणीकर्म मंत्री आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर ते पहिल्यांदाच दौऱ्यावर आले होते. पहिल्याच दौऱ्यात त्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार आणि मंत्र्यांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागतो आहे. (हेही वाचा, Buldhana Shiv Sena: बुलढाणा येथे शिवसेना, शिंदे गटात तुफान राडा, खुर्चांची फेकाफेकी आणि पोलिसांसमोरच एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणामारी)

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टीपेला चालल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतही दसरा मेळाव्यावरुन दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे होत आहे. दसऱ्याला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास कोणाला परवाणगी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोन्ही बाजूंनी अर्ज आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ट्विट

दुसऱ्या बाजूला शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्यातील मुद्द्यांवरची लढाई आता थेट गुद्द्यांवर आली आहे. याची पहिली प्रचिती बुलढाणा (Buldhana) येथे पाहायला मिळाली. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला आज जहाल वळण लागले. त्यातून एका कार्यक्रमात दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या तर काहींनी एकमेकांच्या अंगावर धावून जात थेट लाथाबुक्क्यांनी परस्परांना मारहाण केली. बुलढाणा बाजार समिती परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका सत्कार कार्यक्रमात हा प्रकार घडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif