Actress Deepkfake Photo: मुंबईतील 37 वर्षीय अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

एका पुरुष मित्राने हे फोटो लिक केल्याचा संशय अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Actress Deepkfake Photo: गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)चे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. आता मुंबईतील एका 37 वर्षीय अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले नग्न फोटो (Deepfake Nude Photo) तिच्या मित्राच्या आणि पालकांना फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवण्यात आले आहेत. एका पुरुष मित्राने हे फोटो लिक केल्याचा संशय अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार, 37 वर्षीय अभिनेत्री वर्सोवा, अंधेरी पश्चिम येथे राहते. 27 डिसेंबर रोजी, संध्याकाळी 5.30 वाजता, ती ओशिवरा येथील एका कॅफेच्या दुकानात असताना, तिच्या पुरुष मित्राने तिच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला. त्याने सांगितले की, कुलदीप द्विवेदीशी लिंक असलेल्या फेसबुक अकाउंटवरून तिला तिचे मॉर्फ केलेले नग्न फोटो आणि संदेश मिळाले आहेत. तिने त्याला मॉर्फ केलेल्या फोटोंचे स्क्रीनशॉट पाठवायला सांगितले. (हेही वाचा - Ashwini Vaishnaw On Deep fake: डीप फेक विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकार आणणार कायदा- अश्विनी वैष्णव)

मित्र आणि कुटुंबाला पाठवले नग्न फोटो -

7 जानेवारी रोजी तिने ऑनलाइन तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, तिच्या आईने पंजाबमध्ये राहणाऱ्या तिच्याशी संपर्क साधला आणि तिला फोटोसंदर्भात माहिती दिली. तिच्या आईला एका मोबाईल नंबरवरून अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले नग्न फोटो पाठवण्यात आले. तर तिच्या वडिलांना दुसऱ्या क्रमांकावरून फोटो पाठवण्यात आले. त्यानंतर, एका मैत्रिणीने अभिनेत्रीला सांगितले की, तिला आणि त्यांच्या दोन मित्रांना त्यांच्या Instagram खात्यांवर kgxjcdjvfdg या आयडीवरून अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले फोटो मिळाले आहेत. (Rashmika Mandanna Morphed Viral Video: रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांचे कठोर कारवाईचे आदेश)

दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्येही तिला तिच्या मित्राच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ydryhdtj नावाच्या आयडीवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. 31 डिसेंबर रोजी, अभिनेत्रीच्या आणखी एका मित्राला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मॉर्फ केलेले नग्न फोटो मिळाले. अभिनेत्रीने दावा केला की, तिला पुण्यातील पिरंगुट येथे राहणार्‍या पुरुष मित्रावर संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Rashmika Mandanna's Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मेटाकडून मागवली माहिती)

अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरुपात लैंगिकदृष्ट्या स्पष्ट असलेली कोणतीही सामग्री प्रसारित करणे) आणि 67 (अ) (लैंगिक सामग्रीचे प्रसारण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.