Fake Birth Certificates to Illegal Bangladeshi Immigrants in Malegaon: मालेगाव मध्ये जन्म दाखला घोटाळा तपासासाठी CM Devendra Fadanvis यांच्याकडून SIT द्वारा चौकशीचे आदेश

एसआयटीचे अध्यक्ष डीआयजी नाशिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील.

CM Devendra Fadanvis | X @ANI

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 जानेवारी) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमधील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना दिल्याच्या आरोपांची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटीचे अध्यक्ष डीआयजी नाशिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील. पोलिसही या टीमचा एक भाग असतील. या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी ते तपास करणार आहेत आणि उपाययोजनांसह अहवाल देणार असल्याचं महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

2 जानेवारी रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की, मालेगावमधील सुमारे 1,000 जणांनी जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बांगलादेशी रोहिंग्या असल्याची चुकीची माहिती दिली. "नाशिक जिल्हाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेने या प्रकरणाचा संपूर्ण आढावा सुरू केला आहे.

"मालेगावातील सुमारे 1,000 लोकांनी बांगलादेशी रोहिंग्या असल्याचे चुकीचे दाखवून, तहसीलदारांना भेटून जन्म दाखले मिळवून एक घोटाळा केल्याचे मला आढळले आहे. आता नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेने संपूर्ण आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. " असेही ते म्हणाले आहेत. Bangladeshi Nationals Arrested In Mumbai: मुंबई मध्ये बनावट मतदार ओळखपत्र, रहिवासी पुरावा बाळगून राहणार्‍या चौघांना अटक; लोकसभा निवडणूकीत मतदान ही केल्याचे उघड .

काही दिवसांपूर्वी, दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर इमिग्रेशन रॅकेट, बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि बनावट वेबसाइटद्वारे इतर बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी पाच बांगलादेशी नागरिकांसह 11 जणांना अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने बनावट वेबसाइटद्वारे बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करून बांगलादेशी नागरिकांची सोय केली ज्यासाठी तो ₹ 15,000 आकारत असे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now