Epidemic in Mumbai: मुंबई शहरात वाढले साथीचे आजार; डेंग्यू, हिवतापाने मुंबईकर त्रस्त
कोरोना विरोधात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. असे असतानाच आता पावसाळी साथीचे आजार मुंबई शहरात डोके वर काढताना दिसत आहेत. प्रामुख्याने डेंग्यू (Dengue), हिवताप (Malaria) रुग्णांची संख्या वाढते आहे.
मुंबईकर (Mumbaikar) नागरिक हे एका बाजूला कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा सामना करत आहे. कोरोना विरोधात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. असे असतानाच आता पावसाळी साथीचे आजार मुंबई शहरात डोके वर काढताना दिसत आहेत. प्रामुख्याने डेंग्यू (Dengue), हिवताप (Malaria) रुग्णांची संख्या वाढते आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई (Mumbai) शहरात डेग्युच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत पाठिमागील महिन्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपट झाली आहे. मुंबई शहरात मधल्या काळात पावसाने विश्रांती घेऊन पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यांमुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणाव होते. हे डासच साथिच्या रोगाचे प्रमुख कारण ठरतात.
प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्यात मुंबईत डेंग्युचे जवळपास 37 रुग्ण होते. त्यात आता वढ होऊन ती संख्या 132 वर पोहोचली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या काळात डेंग्युची रुग्णसंख्या 209 इतकी झाली आहे. पाठिमागील वर्षी ही संख्या 129 इतकी होती. मलेरिया रुग्णांच्या संख्येतही काहीशी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मलेरीयाचेही 790 रुग्णांची नोंद झाली आहे. (हेही वाचा, Monsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले)
कोणताच आजार अथवा दुखणे अंगावर काढू नका, असे आरोग्य विभागाकडून नेहमीच सांगितले जाते. मात्र, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी, किरकोळ ताप अशा कारणांसाठी अनेक नागरिक रुग्णालयात जात नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेते नाहीत. असे दुखणे शक्यतो ते अंगावरच काढण्याचा प्रयत्न करतात. काही नागरिक तर जवळच्या मेडिकल स्टअरमध्ये जाऊन औषध विक्रेत्याला होणारा त्रास सांगतात व त्याच्याकडूनच त्याच्या सल्ल्याने औषधे घेतात. असे केल्याने आजार बळावतो. अगदीच सहन झाले नाही तर, अशी मंडळी डॉक्टरांचा सल्ला घेतात. असे केल्यानेच संसर्गजन्य आजारांचा मुक्काम अधिक काळ वाढतो, असे डॉक्टर सांगतात.
दरम्यान, मुंबईत पावसाची संततधार दीर्घकाळ कोसळत राहते हा पूर्वानुभव ध्यानात घेऊन मुंबई महापालिका आणि खासगी रुग्णालयंही औषधांचा पुरेसा साठा आगोदरच तयार ठेवण्यावर भर देतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जरी रुग्णांची संख्या वाढली तरी, त्यांना सेवा देणे शक्य होते. मात्र, कधी कधी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालया बेडची संख्या कमी पडण्याचे प्रकार घडतात.
दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून, गाळून आणि थंड करुनच प्या. बाहेरचे खाने टाळा. बाहेर जाताना शक्यतो घरचे अन्न सोबत घेऊन जा. कोणताही आजार जसे की, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी अंगावर काढू नका. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असा आहार घ्या. पावसात भिजल्यावर लगेच वातानुकुलीत वातावरणात (एसी) जाऊ नका. कपडे केस ओले ठेऊ नका. डॉक्टरांनी दिलेला प्रतिजैविकांचा कोर्स अर्धवट सोडू नका.