Nitin Raut Tested Covid-19 Positive: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना व्हायरसची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती

काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची कोरोना चाचणी (Covid-19 Test) पॉझिटिव्ह आली आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Nitin Raut (Photo Credit: ANI)

Nitin Raut Tested Covid-19 Positive: महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांची कोरोना चाचणी (Covid-19 Test) पॉझिटिव्ह आली आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

नितीन राऊत यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोन चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या, असं आवाहन नितीन राऊत यांनी नागरिकांना केलं आहे. (हेही वाचा -Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 96,424 नव्या कोरोनाबाधितांची भर; एकूण रूग्ण संख्या 52 लाखांच्या पार)

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यातील सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोना व्हायरसचं सक्रमण झालं होतं. परंतु, त्यांना कोरानाची लक्षणं नसल्याने घरातचं होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.