Co-Operative Society Election: मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच कोरोनाचे निर्बंधही आणखी कडक करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच कोरोनाचे निर्बंधही आणखी कडक करण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) आणखी एक निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना (Co-Operative Society Election) 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत सहाव्यांदा या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी 31 मार्चपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 31 ऑगस्टपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रलंबित असलेल्या सुमारे 45 हजार 276 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याने स्पष्ट झाले आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने जाहीर केला आहे. राज्यात विविध प्रकारच्या 2 लाख 58 हजार 786 सहकारी संस्था आहेत. त्यापैकी 45 हजार 276 संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत. हे देखील वाचा- 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा; Rajesh Tope यांच्या केंद्राकडे मागण्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यातील अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मध्यंतरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. परंतु, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.