Eknath Khadse Will Join NCP Today: एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

गेल्या 40 वर्षांपासून भाजप (BJP) पक्षात असणारे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीररित्या प्रवेश करणार आहेत.

Eknath Khadse | (File Photo)

Eknath Khadse Will Join NCP Today: आज महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एक मोठी घटना घडणार आहे. गेल्या 40 वर्षांपासून भाजप (BJP) पक्षात असणारे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, बुधवारी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पक्षांतर करण्यासाठी एकनाथ खडसे गुरुवारी हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेदेखील मुंबईत दाखल झाल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसेही (Rohini Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. याशिवाय भाजपचे अनेक नेते तसेच स्थानिक पदाधिकारीदेखील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे मात्र भाजपमध्येचं राहणार आहेत. (हेही वाचा - Why is Eknath Khadse joining NCP? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का? एकनाथ खडसे यांनी दिले उत्तर)

दरम्यान, बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं होतं. एकनाथ खडसे यांनी 1980 मध्ये भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया भक्कम केला. खडसे यांनी 1987 मध्ये कोथडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते पहिल्यांचा सरपंच झाले होते. त्यानंतर 1989 मध्ये खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. एकनाथ खडसे यांच्या नावावर सलग तीस वर्ष मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचा पराक्रम आहे.

एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपने तिकीट नाकारले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी खडसे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एबी फॉर्मही तयार ठेवला होता. परंतु, त्यावेळी खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा विचार केला नव्हता.