ED Summons Pratap Sarnaik: ईडीने शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा धाडले समन्स, गुरुवारी उपस्थितीत राहण्याचे दिले आदेश

Pratap Sarnaik | (Photo Credits: Facebook)

ED Summons Pratap Sarnaik:  शिवसेना (Shiv Sena) खासदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने 24 नोव्हेंबर रोजी धाड टाकली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सरनाईक यांनी उपस्थितीती लावली नाही. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा ईडीकडून प्रताप सरनाईक यांना समन्स धाडण्यात आले असून गुरुवारी उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले आहेत.(Sanjay Raut On BJP: जुनी थडगी उकरत ED हडप्पा, Mohenjo-daro काळापर्यंत पोहोचेल; संजय राऊत यांचा टोला)

ईडीने प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा पुत्र विहंग सरनाईक याची ईडीकडून तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स पाठवले होते. परंतु प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाइनचे कारण देत एक आठवड्याची मुदत मागितली होती. तर प्रताप सरनाईक यांनी मागितलेला कालावधी संपला असल्यानेच ईडीने आता तिसऱ्यांदा समन्स पाठवत हजर राहण्यास सांगितले आहे.(प्रताप सरनाईक यांचे मित्र अमित चांदोळे यांना ED कडून अटक; टॉप्स सिक्युरिटी समुहाच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर कारवाई)

 Tweet: 

प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ज्या वेळी ईडीने धाड टाकली त्यावेळेस ते परदेशात होते. मात्र ईडीने छापेमारी केल्याचे कळताच ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट ही घेतली. या दोघांमध्ये जवळजवळ दीड तास चर्चा झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे मीडियाला सांगितले. त्याचसोबत कोणत्या संदर्भात ईडीने ही कारवाई केली हे सुद्धा कळले नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.

या छापेमारीनंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी शिवसेना आणि त्यांचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी असे म्हटले की, कोणत्याही पुराव्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. ईडीकडे काहीतरी महत्वाचे पुरावे असतील आणि त्याची माहिती त्यांना मिळाली असणार असे म्हटले होते. त्याचसोबत जर प्रताप सरनाईक यांनी कोणता घोटाळा केला असेल तर त्याचा तपास जरुर करण्यात आला पाहिजे.