ED Raids On Anil Parab: मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

त्यांच्याविरूद्ध किरिट सौमय्या यांनी दापोली मध्ये अनधिकृतपणे रिसोर्ट बांधल्याचा दावा केला आहे.

मंत्री अनिल परब | (File Photo)

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) आज ईडीच्या (ED) रडार वर आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार महाराष्ट्रातील त्यांच्या 7 ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर ईडीने छापेमारी करायला सुरूवात केली आहे. अनिल परब यांचे मुंबई मधील खाजगी निवासस्थान, शासकीय निवासस्थान येथे ही धाड पडली आहे. अनिल परब हे महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. धाड पडलेल्या 7 ठिकाणांमध्ये मुंबई, दापोली, पुणे चा समावेश आहे. अनिल परब स्वतः अजिंक्यतारा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी हजर आहेत.

अनिल परब यांची काही महिन्यांपूर्वी ईडी चौकशी झाली होती. त्यांच्याविरूद्ध किरिट सौमय्या यांनी दापोली मध्ये अनधिकृतपणे रिसोर्ट बांधल्याचा दावा केला आहे. आज त्यांच्या घरी ईडीच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली आहे त्यामध्ये त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी अनिल देशमुख यांनी पोलिस बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात अनिल परबांचाही हात असल्याची चर्चा होती. हे देखील नक्की वाचा: Maha Vikas Aghadi: रामदास कदम यांनीच मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना पुरवली? 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेत खळबळ .

दरम्यान अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अ‍ॅडव्हकेट असलेल्या अनिल परबांकडे आगामी बीएमसी निवडणूकींच्या दृष्टीने मोठी जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. अशामध्येच आता त्यांच्यावर ईडी कारवाई होणं हे शिवसेनेसाठी मोठं नुकसानकारक आहे. काल पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना देखील ईडीने समन्स पाठवला आहे. यापूर्वी त्यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली होती.