दिल्लीत UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांचा राज्यात परतण्याचा मार्ग मोकळा; 1400 विद्यार्थ्यांसाठी धावणार स्पेशल ट्रेन

कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्रातील 1600 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यापासून अडकले होते. मात्र, आता या विद्यार्थांसाठी 16 मे रोजी दिल्ली-पुणे स्पेशल ट्रेन धावणार आहे.

भारतीय रेल्वे (File Photo)

दिल्लीला (Delhi) यूपीएससी (UPSC) च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्रातील 1600 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यापासून अडकले होते. मात्र, आता या विद्यार्थांसाठी 16 मे रोजी दिल्ली-पुणे स्पेशल ट्रेन धावणार आहे.

दरम्यान, दिल्लीहून सुटणाऱ्या या स्पेशन ट्रेनसाठी चार स्टॉपची परवानगी देण्यात आली आहे. ही ट्रेन दिल्लीहून भुसावळ मार्गे पुण्याला जाणार आहे. या ट्रेनला भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे हे चार स्टॉप असणार आहेत. या ट्रेनमध्ये 1400 विद्यार्थांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Glenmark Pharmaceuticals ने COVID-19 रूग्णांवर अ‍ॅन्टी व्हायरल Favipiravir औषधासह क्लिनिकल ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्याला केली सुरूवात; ऑगस्ट 2020 पर्यंत अभ्यास पूर्ण होण्याची शक्यता)

राज्यात परतल्यानंतर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून सर्वांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी रेल्वेची मागणी केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif