Durga Bhosle-Shinde Passes Away: ठाकरे गटाला धक्का; युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दुर्गा भोसले-शिंदे यांचे अकस्मात निधन (Durga Bhosle-Shinde Passes Away) झाल्याने राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे. दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosle-Shinde) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ( Heart Attack) निधन झाल्याचे समजते. त्या केवळ 30 वर्षांच्या होत्या.

Durga Bhosle-Shinde | (Photo Credit - Facebook)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवासेना सचिव अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचे अकस्मात निधन (Durga Bhosle-Shinde Passes Away) झाल्याने राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे. दुर्गा भोसले-शिंदे (Durga Bhosle-Shinde) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ( Heart Attack) निधन झाल्याचे समजते. त्या केवळ 30 वर्षांच्या होत्या. दुर्गा यांच्या पश्चात पती आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही दुर्गा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे महाविकासआघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या 'जन आक्रोश' मोर्चातही त्या सहभागी झाल्या होत्या. मोर्चात जोरदार घोषणा देत सहकाऱ्यांसोबत चालताना त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, नेते आणि सर्वच राजकीय मंडळींना धक्का बसला आहे. मुंबई येथील राहत्या घरुन आज सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा, Sudhir Naik Dies: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबईचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन)

ट्विट

युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:ख व्यक्त केले आहे. 'हे ऐकूण प्रचंड धक्का बसला. अॅड. दुर्गा भोसले-शिंदे आता आपल्यात नाहीत. आम्ही आमची एक अत्यंत कष्टाळू, मेहनती आणि प्रेमळ युवा सैनिक गमावला आहे. त्याच्या निधनामुळे झालेले दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. ओम शांती', अशा आशयाची ट्विटर पोस्ट आदित्य ठाकरे यांनी लिहीली आहे.