Dilip Walse Patil on Sharad Pawar: शरद पवार यांच्या सभेला पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं; दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

आपण राजकारणाला हापापलेलो नाही. मात्र, विकासाच्या दृष्टीने काही भूमिका घेऊन काही निर्णय आपण घेतले आहेत. त्यामुळे जर पुढे कधी शरद पवार यांची सभा आपल्या मतदारसंघात झाली तर, आपल्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सभेला उपस्थित राहावे, असे अवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Sharad Pawar, Dilip Walse Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Dilip Walse Patil Appeal To NCP workers: शरद पवार (Sharad Pawar) हे आपले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही काहीही वाईट बोलू नये. आपलं भांडण शरद पवार यांच्यासोबत नाही. आपण राजकारणाला हापापलेलो नाही. मात्र, विकासाच्या दृष्टीने काही भूमिका घेऊन काही निर्णय आपण घेतले आहेत. त्यामुळे जर पुढे कधी शरद पवार यांची सभा आपल्या मतदारसंघात झाली तर, आपल्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सभेला उपस्थित राहावे, असे अवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. ते आंबेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे निकटीवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर दिलीप वळसे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. सध्या ते अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या संपूर्ण भाषणामध्ये शरद पवार यांच्यावर कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. शरद पवार हेच आपले नेते आहेत. मतदारसंघामध्ये आज जेवढी कामे झाली आहेत. ती सर्व कामे माझ्यामूळे नव्हे तर शरद पवार यांच्यामुळेच झाली आहेत. आजही मी ती कामे आपल्यामुळे झाली आहेत असे म्हणनार नाही, अशी भावान दिलीप वळसे पाटील यानी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव येथे बोलत होते. (हेही वाचा, Sharad Pawar Nashik Yeola Sabha: शरद पवार यांनी मागीतली माफी, नागरिकांना अवाहनही केले; नाशिक येथील सभेत काय घडलं? घ्या जाणून)

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेल्या बंडाला नेमका किती आमदारांनी पाठिंबा दिला आहे? याबाबत अद्यापही पुरेशी माहिती नाही. तसेच, शरद पवार यांच्या समर्थक आमदारांचाही नेमका आकडा पुढे आला नाही. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह नऊ आमदारांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता उर्वरीत आमदारांपैकी अजित पवार यांच्या पाठीशी किती आणि शरद पवार यांच्या पाठीशी किती याबाबत आगामी काळातच माहिती मिळू शकणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif