WhatsApp Adopts Villages in India: महाराष्ट्र, कर्नटक राज्यातील 500 गावे व्हाट्सअ‍ॅपने घेतली दत्तक, डिजिटल पेमेंटला देणार चालणा

व्हाट्सअ‍ॅपने नुकतीच या महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्यास चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मेटा (Meta) कंपनीची मालकी आणि सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp ) महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकातील (Karnataka) सुमारे 500 गावे दत्तक (WhatsApp Adopts Villages in India) घेतो आहे. व्हाट्सअ‍ॅपने नुकतीच या महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्यास चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. फ्यूल फॉर इंडिया 2021 मध्ये व्हाट्सअ‍ॅपने घोषणा केली होती की, भारतात मेटाचा वार्षीक कार्यक्रम आपल्या कुटुंबाच्या अ‍ॅपद्वारे देण्यात आलेल्या सकारात्मक प्रभाव आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तनास प्रदर्शीत करतो. कंपनीने म्हटले आहे की, या कार्यक्रमाचा उद्देश आहे की, तळागाळात डिजिटल पेमेंटमध्य व्यवहाराकी बदल घडवून आणने.

व्हाट्सअ‍ॅपचे भारतातील प्रमुख अभिजित बोस यांनी एका प्रतिक्रियेदरम्यनस सांगितले की, 'व्हाट्सअ‍ॅपवर आम्ही देशातील आर्थिक व्यवहारांमध्ये गतीमानता आणण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही पुढच्या 500 मिलियन डिजिटल पेमेंटवर प्रयोगाची वास्तवता पडताळून पाहात आहोत. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 500 गावे दत्तक घेतली आहेत. या ठिकाणी हा आमचा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरु केला आहे.' (हेही वाचा, WhatsApp New Feature: आता अनोळखी लोक तुमचे Last Seen आणि Online Status पाहू शकणार नाहीत; लवकरच येत आहे नवीन फिचर, घ्या जाणून)

अभिजित बोस यांनी पुढे बोलताना सांगितले की, व्हाट्सअ‍ॅपने युजर्सना अधिक विश्वास आणि तळागाळातील घटकांसह यूपीआय वापरण्यास चालना देऊ शकते. आम्ही तळागाळात युजर्सला शिक्षित करण्यासाठी या उपक्रमात विशेष प्रयत्न करु. डिजिटल पेमेंट उत्सव नावाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 15 ऑक्टोबरपासून कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील क्याथनाहल्ली गावातून सुरु झाला. या ठिकाणी डिजिटल पेमेंटच्या विविध पैलुंचा परिचय करुन देण्यात आला आहे. यात यूपीआयसाठी साईन अप करणे, यूपीआय खाते स्थापीत करणे आणि डिजिटल पेमेंटचा वापर करण्यासारख्या सर्वोत्तम सेवा उपलब्ध करुनदिल्याचेही बोस यंनी सांगितले.

व्हाट्सअ‍ॅप डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून छोट्या छोट्या गावातील ब्युटी-पार्लर, पोल्ट्री व्यवसायिक, आदी लोकांनाही व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. जसे की, एखादा ग्राहक व्हाट्सअ‍ॅपवरुन ऑर्डर देऊ शकेल तसेच मिळालेल्या सेवेच्या मोबधल्यात व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनच पैशांचा परतावा करेन.