Anna Hazare Slams Modi Government: दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारला सवाल

दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून सरकारचा चर्चेचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे.

Anna Hazare , Naredra Modi (Photo Credit: PTI)

केंद्र सरकारने (Central Government) आणलेलया नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरु आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून सरकारचा चर्चेचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे. तसेच सरकारने आमच्या आंदोलनाचा अपनान केला असल्याचे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, मग दिल्लीत अंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याशी चर्चा करायला का जात नाही. हे शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का? असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी ही वागणूक योग्य नाही. निवडणुका आल्या की राजकारणी मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरी जाऊन मत मागतात. मग त्यांच्या मागण्यासंबंधी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही?, असा सवाल अण्णा हजारे उपस्थित केला आहे. तसेच शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे. तरीही अद्यापही शेतकरी संयमाने आंदोलन करीत आहेत. यातून हिंसा भडकली तर याला जबाबदार कोण? अशा शब्दात अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. हे देखील वाचा- Urmila Matondkar To Join Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार; उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतील बुराडी मैदानात आंदोलन करावे असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शेतकऱ्यांपुढे ठेवला होता. त्यानंतर सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार आहे, असे अमित शहांनी म्हटले होते. शेतकरी नेत्यांनी अमित शहांचा हा प्रस्ताव मात्र धुडकावून लावला होता. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे आंदोलन आक्रमक दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. यामुळे कृषी कायद्यासंर्दभात केंद्र सरकार कोणती भुमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.