Mumbai: लॉकडाऊन दरम्यान राहिल्या आलेल्या 17 वर्षीय मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार; आरोपी अटकेत
17 वर्षीय मुलीवर कुटुंबातील व्यक्तींकडून बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एका 40 वर्षीय व्यक्तीने सलग दोन महिने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या (Mumbai) भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये (Bhoiwada Police Station) पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आसून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ही धुळे (Dhule) येथे राहते. फ्री प्रेस जनरलच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊन दरम्यान ही मुलगी मुंबईतील परेल येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती. धुळे येथे आपल्या घरी परतल्यानंतर तिने सर्व प्रकार आपल्या आई-वडीलांना सांगितला.
17 वर्षीय पीडित मुलीने दिेलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तिच्या नातेवाईकाने अनेक वेळा बलात्कार केला. घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर संधी साधत आरोपी बलात्कार करत असे. मुलीच्या पोटात खूप दुखू लागल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांच्या तपासणीत मुलीचा लैंगिक छळ झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी झीरो एफआयआर (Zero FIR) नोंदवत हे प्रकरण मुंबईच्या भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये ट्रान्सफर केलं.
ANI Tweet:
बलात्काराचा व्हिडिओ शूट केला असून तो व्हायरल करेन, असे सांगून आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत असे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. (Pune Rape: प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना)
महिलांवरील अत्याचार, बलात्काराच्या घटनांचे सत्र सातत्याने सुरुच आहे. सातत्याने नवनव्या घटना समोर येत आहेत. जळगाव येथे गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला. तर 3 वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना मुंबईतूनच समोर आली होती. या सर्व घटनांमुळे आपल्या समाजातील स्त्री सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम आहे.